👁 10 Views

पंढरपूर सिंहगडच्या प्राध्यापकांचा आयआयटी मुंबईच्या कार्यशाळेत यशस्वी सहभाग


Pandharpur Live-   
पंढरपूर : प्रतिनिधी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींगला महाविद्यालयातील प्राध्यापकांनी लाॅकडाऊन कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आयआयटी मुंबईच्या कार्यशाळेत यशस्वी सहभाग नोंदविला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
   यावेळी आयआयटी मुंबईच्या माध्यमातून पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. सद्या सर्वञ कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना केल्या जात. कोविड-१९ ची परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात ऑनलाईन शिक्षण पद्धतीला पर्याय उपलब्ध नसून यासाठी प्राध्यापकांना प्रशिक्षण असण्याची आवश्यकता आहे.
पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींगला महाविद्यालयातील प्राध्यापकांची या कार्यशाळेत यशस्वी नोंदणी व सहभाग झाल्यानंतर आता येणाऱ्या सत्रामध्ये या पद्धतीच्या शिक्षण प्रणालीचा यशस्वी वापर प्राध्यापकांना करता येईल. ऑनलाईन पद्धतीने देण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांना उत्तम ज्ञान प्राप्त झाले आहे.
   Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

   पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भविष्यात ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेता यावे यासाठी आयआयटी मुंबई च्या माध्यमातून प्राध्यापकांना ऑनलाईन कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले आहे. Bodhitree या माध्यमातून रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स, पाॅवर पाॅईट, प्रेझेंटेशन, क्वीझ, टेस्ट इत्यादी सर्व एकाच व्यासपीठावर उपस्थित होणार असून आता ते विद्यार्थ्यांना एकत्र देता येईल. असा कोर्स आता प्राध्यापकांना तयार करता येईल व त्याचा विद्यार्थ्यांना सहज पद्धतीने वापर करता येईल. प्राध्यापकांनी या व्यासपीठाचा वापर करण्याचे आवाहन प्राचार्यांकडून करण्यात आले असून पुढील सत्रातील शिक्षण पद्धतीसाठी प्राध्यापक सक्षम होत आहेत. त्यामुळे सोशल मिडिया च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आयआयटी मुंबई कार्यशाळेचा प्राध्यापकांना  फायदा होणार असल्याचे अभियांत्रिकी चे अधिष्ठाता डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांनी सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *