Crime in Solapur | दोन मुलांची हत्या करून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; सोलापुरात खळबळ

Loading

  

Pandharpur live : दोन  लहान मुलांची हत्या (Murrder of Two Son) करून मातेने गळफास घेऊन आत्महत्या (Woman Suicide) केली. ही घटना विजापूर रोड परिसरातील राजस्व नगरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.

 ज्योती सुहास चव्हाण (वय 27) तिची दोन मुले अथर्व चव्हाण (वय साडेतीन वर्षे) आणि मुलगी आर्या चव्हाण (वय 2 ) वर्षे अशी मयतांची नावे आहेत.

गुरुवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. घरातील छताला ज्योती चव्हाण हिचा मृतदेह ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तर अथर्व आणि आर्या यांचे मृतदेह घरात आढळले. त्यांचा गळा दाबून हत्या करून मातेने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मयत ज्योती हिचे पती सुहास चव्हाण हे एसटी महामंडळात नोकरीस असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.


    राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये वाढ

    महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. महिलांवरील अत्याचार, खून, दरोडा यांसारख्या घटना सध्या वाढताना दिसत आहे. त्यात आता सोलापुरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *