👁 5 Views

सोलापूर येथील दस्त नोंदणी कार्यालये शनिवारी, रविवारी राहणार सुरु – सह. जिल्हा निंबधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गिते

  Pandharpur live : सोलापूर, दि.08 (जिमाका) :- नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिका क्षेत्रातील दस्त नोंदणी कार्यालये शनिवार व रविवार या शासकीय सुट्टीचे दिवशी सुरू ठेवणेबाबतचा महत्त्वाचा निर्णय राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आहे.त्याअनुषंगाने सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील सह. दुय्यम  निंबधक वर्ग-2 , उत्तर सोलापूर-2 हे कार्यालय शनिवार व रविवार या शासकीय सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार असल्याची माहिती  सह. जिल्हा निंबधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गिते यांनी सांगितले.

            खरेदी विक्री व्यवहारांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांना त्यांच्या कामाच्या वेळेत दस्त नोंदणी करणे शक्य होत नाही तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही दस्त नोंदणी करता यावी यासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

         सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील सह. दुय्यम  निंबधक वर्ग-2 , उत्तर सोलापूर-2 हे कार्यालय शनिवार व रविवार या शासकीय सुट्टीच्या  दिवशी दस्त नोंदणीसाठी सुरू ठेवण्यात आलेली असून, जास्तीत जास्त नागरीकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही सह. जिल्हा निंबधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गिते यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *