👁 5 Views

सोलापूर : विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू; मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

 

Pandharpur live : घरातील पाण्याची मोटर जोडताना विजेचा धक्का लागून एका दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज (दि.९) सकाळी साडेनऊच्या सुमारास लष्करी भागात घडली.

शांतराज युवराज तिल्लारे ( वय १०, रा. उत्तर सदर बाजार, लष्कर, सोलापूर) असे मृत बालकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी पाणी भरण्यासाठी मोटर जोडत असताना शांतराजला विजेचा धक्का बसला. बेशुद्ध अवस्थेत नातेवाईकांनी तातडीने त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. बालकाचा मृतदेह सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असून या ठिकाणी शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे, काँग्रेस नेते प्रा. नरसिंह आसादे, काँग्रेसचे माजी युवकाध्यक्ष अंबादास करगुळे, हणमंतु सायबोळू यांच्यासह अनेक नागरिक ठाण मांडून आहेत.

महापालिकेच्या गलथान कारभारामुळे या बालकाचा जीव गेल्याचा आरोप करण्यात आला असून मृत बालकाच्या कुटुंबीयांना जोपर्यंत महापालिकेकडून शासकीय मदत मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा संतप्त पवित्रा अंदोलकांनी घेतला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *