👁 6 Views

उपाययोजनांचा भंग करणाऱ्यांकडून सुमारे तेरा लाख रुपयाचा दंड वसूल

Pandharpur Live – 

          सोलापूर, दि. 8:कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा भंग करणाऱ्यांकडून सुमारे  तेरा लाख तेरा हजार दोनशे तीस रुपयाचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
          जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसिलदार कार्यालय आणि नगरपालिका प्रशासनाकडून या बाबतची कारवाई करण्यात आली. सहा आणि सात जुलै रोजी  ही कारवाई करण्यात आली. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे,  दुचाकी वरुन दोघांनी प्रवास करणे , सोशल डिस्टन्सींग न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखुचे सेवन करणे याबद्दल ही कायदेशीर कारवाई केली आहे. यामध्ये पोलीस अधिक्षकांनी  5063 प्रकरणात  1048750 रुपयांचा दंड वसूल केला. सर्व तहसीलदार कार्यालयाने 196 प्रकरणात 30 हजार रुपयाचा तर सर्व नगरपालिका प्रशासनाकडून 1581 प्रकरणात 2,34,480 रुपयांचा दंड वसूल केला

Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *