👁 10 Views

पंढरपूर तालुका- आजची कोरोना संदर्भातील सविस्तर माहिती… काही तासातच कोरोनाचा रिपोर्ट हाती येण्यासाठी प्रशासनाची तयारी!

Pandharpur Live-   आज गुरूवार दि. 9 जुलै रोजी पंढरपूरमध्ये  रोहिदास चौक येथे एक सारीचा रूग्ण आढळून आला आहे.  आज एकुण वाखरी येथील कोविड सेंटरमधुन 8 रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला आहे. 


 सद्यस्थिती मध्ये पंढरपूर शहरातील 11, पंढरपूर ग्रामीण मधील 4 व इतर तालुके व जिल्ह्यातील 7 अशा एकुण 22 कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 


आज संत गजानन महाराज मठात 74 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत.


काही तासातच कोरोनाचा रिपोर्ट हाती येईल यासाठी प्रशासनाची तयारी सुरू असुन, याचेच पुढचे पाऊल म्हणजे  आज वाखरी येथील कोविड सेंटर येथे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या सुचनेनुसार रॅपीड अॅन्टीजेन ट्रेनिंग घेण्यात आले. 

अशी माहिती पंचायत समिती चे पंढरपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.


 लवकरच पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना ची रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट घेण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. ही टेस्ट घेण्यास सुरुवात झाल्यानंतर कोरोनाचे रिपोर्ट काही तासात हाती येतील आणि यामुळे साहजिकच कोरोना चा फैलाव रोखणं सुलभ जाईल. 


नागरिकांनी कोरोनाची लक्षणं आढळून आल्याबरोबर तातडीने आपली कोरोना टेस्ट करून घेण्यास पुढे येणे अत्यावश्यक आहे. 

Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *