👁 10 Views

धक्कादायक… पंढरीत 21 वर्षीय विवाहित महिलेची हत्या… एकास अटक



पंढरपूर लाईव्ह- पंढरीत एका 21 वर्षीय महिलेच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे. 


सदर घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.  कुंभार गल्ली येथे निकीता आकाश पवार या महिलेच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या झाल्याचे दिसुन आले.  याप्रकरणी महिलेचा पती आकाश पवार यास पोलिसांनी ताब्यात घेतले असुन. पुढील कार्यवाही सुरू आहे. 

सदर महिलेचा विवाह 4 महिन्यापुर्वीच झाला होता, महिलेचा पती आकाश पवार याचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता व यातुनच हा गुन्हा घडल्याचे व आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाल्याचे समजते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *