चित्रकला स्पर्धेतील प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांची चित्रे.
कोव्हीड-१९ या जागतिक महामारीच्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच त्यांच्या कला-गुणांना वाव देण्याचा अभिनव उपक्रम श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन येथे अविरत व जोमाने चालू आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाची शिदोरी मिळत आहे व त्याचबरोबर भावी पीढीतील उत्कृष्ट असे कलाकार घडविण्याचे कार्यही निरंतर चालू आहे.
ऑनलाईन शिक्षणासोबतच ऑनलाईन चित्रकलेचे तासही घेवून कलाकारांच्या कलेला न्याय देण्याचे कार्य चालू आहे. याच अनुषंगाने दि.२०.०६.२०२० रोजी शाहू महाराज जयंती निमीत्त ऑनलाईन चित्रकला स्पर्धा घेण्यात आली यामध्ये स्पर्धेसाठी ४-गट करण्यात आले होते छोटा अ-गट- इ. १ ली व २ री, ब-गट इ.३ री व ४ थी क-गट, इ.५ वी व ६ वी ड-गट, इ.७ वी व ८ वी गट होते. प्रत्येक गटातील विजेत्यांचे प्रथम, व्दितीय व तृतीय असे प्रत्येकी ३ क्रमांक काढण्यात आले.
छोट्या गटामध्ये राजवीर डुबल (ज्यु.केजी) प्रथम क्रमांक, दर्शना धुमाळ (ज्यु.केजी.) व्दितीय क्रमांक, कल्याणी उगले (सिनीअर केजी) तृतीय क्रमांक, अ- गटामध्ये प्रणव बनसोडे (इ.२ री ) प्रथम क्रमांक, श्रीदुला कोकटे (इ.२ री) व्दितीय क्रमांक, आरोही शेटे (१ ली) तृतीय क्रमांक, ब-गटामध्ये प्रगती खडके (इ.४ थी) प्रथम क्रमांक, अनुप मस्के (इ.३ री) व्दितीय क्रमांक, समृद्धी माळी (इ.४ थी) तृतीय क्रमांक, क-गटामध्ये हर्षद गोगी (इ.६ वी) प्रथम क्रमांक, ओजस बोरकर (इ.६ वी) व्दितीय क्रमांक, श्रावणी बनसोडे (इ.५ वी) तृतीय क्रमांक, ड-गटामध्ये मधुरा शिंदे (इ.८ वी) हीने तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन करुन शाळेचे नाव लौकीक केले आहे.
या विद्यार्थ्यांना प्रशालेच्या प्राचार्या सौ.शैला कर्णेकर, रजिस्ट्रार श्री गणेश वाळके तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी शुभेच्छा दिल्या याबरोबरच कलाशिक्षक श्री नारायण कुलकर्णी यांचे या विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्पर्धेसाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले.



