कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेसाठी मागील तीनचार महिने प्रशासनाला पंढरपूरातील नागरिकांनी ज्या पध्दतीने सहकार्य केले त्याच पध्दतीने यापुढील काळातही सहकार्य करावे, असे आवाहन आ.प्रशांत परिचारक यांनी संतपेठ, महापूरचाळ, बडवेचर, रोहिदास चौक येथील कंटेन्मेट झोनमधील नागरिकांना भेटीचे वेळी केले.
मागील 15 दिवसापासून पंढरपूरातील परिस्थिती निंत्रणाबाहेर जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पंढरपूर मध्ये सध्या सुमारे 100 हून अधिक कोरोना विषाणुमुळे बाधित रूग्ण संख्या झाली आहे. या रूग्णांमुळे पंढरपूरातील बहुतांशी भाग हा कंटेन्मेट झोन म्हणून जाहीर होवून बंद करणेत आला आहे. त्या भागातील नागरिक हे भयभीत झाले असून त्यांना आधार देणे, त्यांचे अडीअडचणी जाणून घेणेसाठी आज आ.प्रशांत परिचारक यांनी महापूर चाळ, बडवेचर, रोहिदास चौक, संतपेठ भागातील कंटेन्मेट झोनला तेथील नगरपालिका प्रशासन व स्थानिक नगरसेवकांसह भेट देवून धीर देणेचे काम केले.
यावेळी बोलताना आ.प्रशांत परिचारक म्हणाले, दाट लोकवस्ती असलेल्या पंढरपूरातील भागामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे बहुतांश भाग कंटेन्मेट झोन जाहीर झाला आहे. तेथील रहिवाशी यांनी घाबरून न जाता धैयार्ने संकटाला सामोरे जावे. या भागातील सर्वच नागरिकांच स्ट्रीमिंग, ऑक्सिजन तपासणीसोबत रॅपिड तपासणी करणेवरही भर दिला जाणार आहे. रॅपिड टेस्टमुळे कोरोनाचे निदान लवकर होणेस मदत होते. तसेच यावेळी त्यांनी किराणा माल, रेशन, भाजीपाला, दूध आदी दैनंदिन गरजेच वस्तूसाठी व त्या क्षेत्रातील बंद असलेले मेदिकल दुकाने, दवाखाने सुरू करणेबाबत स्थानिक नगरसेवक व नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करणेच्या सूचना दिल्या.
यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर, माजी नगराध्यक्ष वामन तात्या बंदपट्टे, नगरसेवक कृष्णा वाघमारे, नाना वाघमारे, अमोल डोके, उमेश सर्वगोड आदीसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.


