👁 8 Views

आज एकुण 26 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझीटीव्ह… पंढरपूर शहरासह उपनगरातही होतोय कोरोनाचा फैलाव!

आज पंढरपूर शहर व तालुक्यात मिळून एकुण 26 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. कोरोनाचा फैलाव सध्या पंढरपूर शहरासह उपनगरातही वेगाने होत असल्याचे दिसुन येत आहे. शहरातील तानाजी चौक, पोलीस लाईन, रेल्वे स्टेशन, आनंद नगर, शिंदे शाही, महात्मा फुले चौक, रोहिदास चौक, गांधी रोड, कडबे गल्ली, आनंद नगर, गोविंदपुरा, संत पेठ आदी परिसरात आज कोरोना बाधीत आढळुन आले आहेत. तर तालुक्याच्या पुळूज, एकलासपूर आदी गावातही कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळुन आले आहेत.
आज एकुण 113 जणांचे अहवाल प्राप्त झाले असुन यापैकी एकुण 87 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले तर 26 जणांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले. सध्या एकुण 116 जणांवर उपचार सुरु आहेत. आज एकुण 13 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आले आहेत. यापैकी शहरातील 12 जण तर करकंब येथील 1 रुग्ण आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *