👁 8 Views

…अन्यथा 1 ऑगष्ट रोजी काम बंद! श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती कर्मचारी संघटनेचा निर्णय

आषाढी यात्रा 2020 मध्ये श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा दि. 9/7/2020 रोजी रुढी व परंपरेनुसारच संपन्न झाली होती; परंतु या पुजेच्या बाबतीत कांही संघटनांनी श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या द्वेषापोटी उलट-सुलट चर्चा करुन त्याबाबतच्या तक्रारी दिल्यानंतर मंदिर समितीने सभा घेवून मंदिरातील अधिकारी व कर्मचारी यांना कोणत्याही स्वरुपाची खातरजमा व वस्तुस्थितीची शहानिशा न करता मंदिरात व गाभार्‍यात प्रवेश बंदी केली आहे. ही कारवाई न्याय तत्वाला अनुसरुन नाही त्यामुळे मंदिर समितीने मंदिर बंदीबाबतचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा दि. 1 ऑगष्ट 2020 पासुन मंदिर समितीकडील सर्व कर्मचारी कामकाज बंद ठेवून आंदोलन करतील. असा निर्णय श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर कर्मचारी संघ, पंढरपूर यांनी घेतला आहे. अशी माहिती सदर संघटनेच्या वतीने खालील प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *