पंढरपूर-मोहोळ मार्गावरून सोलापूरकडे आढावा बैठकीसाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे जात असतानाच वाटेत त्यांना अपघाताचे दृश्य दिसले. हे दृश्य पाहताच पालकमंत्र्यांनी आपला ताफा तातडीने थांबवला आणि जखमींची विचारपुस करून त्यांना पुढील उपचारासाठी रवाना केले. पालकमंत्र्यांच्या या समयसुचकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रविवार(दि२६) रोजी पंढरपूर – मोहोळ मार्गावरून सोलापूर येथे कोरोना संदर्भात आढावा बैठकीस जात असताना मोहोळ मतदारसंघातील कोन्हेरी फाट्यानजीक दोन मोटारसायकलींचा समोरासमोर अपघात झाला होता. नेमका याचवेळी पालकमंत्री दत्तात्रय(मामा)भरणे व आमदार यशवंत (तात्या)माने यांचा ताफा सोलापूरकडे जात असताना त्यांना अपघात झालेला दिसून आला.
क्षणाचाही विलंब न करता पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय(मामा)भरणे,तालुक्याचे लोकप्रतिनिधी यशवंत(तात्या)माने यांनी ताफा थांबवून झालेल्या अपघातामधील माहिती घेऊन जखमीची विचारपूस करून पुढील उपचारासाठी रुग्णालयाकडे रवाना केले. पालकमंत्री व आमदारांच्या या प्रसंगाविधान राखून दाखवलेल्या समयसुचकतेचे व कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
…………………………………………..
फोटो : -पंढरपूर मोहोळ मार्गावरील कोन्हेरी फाट्यावर झालेल्या अपघात स्थळी थांबवून जखमीची विचारपूस करताना पालकमंत्री दत्तात्रय(मामा)भरणे,आमदार यशवंत(तात्या)माने.
(छाया:संतोष ननवरे)

