सोलापूर – लोकमान्य नगर येथील सौ.इम्तीयाजबी मोहिद्दिन शेख ( वय ७२-रा . लोकमान्य नगर सोलापूर ) यांचे हृदयविकाराने आज शुक्रवारी सायंकाळी सात वाजता अश्विनी रुग्णालयात निधन झाले . त्यांचा दफनविधी अक्कलकोट रोड जडे साब बंगला मुस्लिम कब्रस्तान मध्ये रात्री करण्यात आला त्यांच्या पश्चात पती ,तीन मुले , तीन मुली, सुना , नातवंडे असा परिवार आहे.
सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील सेवानिवृत्त सहाय्यक’ फौजदार मोहिद्दिन शेख उमर शेख यांच्या धर्मपत्नी तर सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखे मधील सहाय्यक फौजदार शमशोद्दीन मोहिद्दीन शेख यांच्या त्या मातोश्री व सहाय्यक फौजदार तैबुद्दिन आलमशहा मुंडे पोलिस ठाणे अंमलदार पंढरपूर शहर पोलिस स्टेशन यांचे त्या सासूबाई होत.

