👁 8 Views

आ. रोहितदादा विचार मंचच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी नागेश जाधव यांची निवड


पंढरपूर प्रतिनिधी – आ. रोहितदादा विचार मंचच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी नागेश शंकर जाधव यांची निवड केल्याचे सोलापूर जिल्हाअध्यक्ष योगेश पाटील यांनी जाहीर केले. मुकतेच या निवडीचे पत्र नागेश जाधव यांना देण्यात आले.

 


आपल्या निवडीबद्दल बोलताना नागेश जाधव म्हणाले की, आमदार रोहितदादांचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी तसेच युवकांचे प्रश्न,सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या सोडवण्यासाठी मी या शहराध्यक्ष पदाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. विचार मंचाच्या ध्येय धोरणानुसार व वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पुढील काळात सक्रीय राहिल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

 यावेळी त्यांचे समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सह.संघटक सचिन आदमिले,सुरज भोसले,पिंटू मांडवे,निलेश कदम आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *