सद्या सर्वञ कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने संचार बंदी घालण्यात आली आहे. या संचार बंदी च्या कालावधीत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात दि. ३ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२० या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने वेबिनार घेण्यात आले. या वेबिनार मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहभागी विद्यार्थ्यांना गेट परिक्षेची तयारी, परदेशी विद्यापीठातील शैक्षणिक संधी, डिझाईन विषयातील करिअर व संधी, कोविड-१९ दरम्यान उद्योगक्षेञातील विविध संधी अशा अनेक विविध विषयांवर प्रा. शशिकांत वडने, इम्पेरिअल ओव्हरसीज एज्युकेशन, कॅडकॅम गुरू पुणे, विजापुर येथील डाॅ. मुरूगेश पटनशेट्टी यांनी ऑनलाईन वेबिनार मध्ये महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींगला महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या तसेच प्राध्यापकांची गुणवत्ता वाढविण्यासाठी सतत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. या कार्यक्रमाचा महाविद्यालयातील पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण ठरत आहे. सहभागी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात नामांकित तज्ञांचे मार्गदर्शन होत असल्याने पालक वर्गातुन पंढरपूर सिंहगडचे कौतुक होत आहे.
हे वेबिनार मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. हे यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील प्रा. सचिन बोळे, प्रा. चंद्रकांत पवार, प्रा. श्रीकांत नागणे, प्रा. समाधान माळी, प्रा. प्रसाद कुलकर्णी आदी सह शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

