👁 9 Views

पांडुरंगाचे सेवेधारी, जनसामान्यांचे कैवारी पांडुरंग स्वरुपात लीन झाले… अवघी पंढरी नगरी गहिवरली… पांडुरंगाला उजवी प्रदक्षिणा घालुन कर्मयोगी सुधाकरपंत परिचारकांच्या अस्थिंचे चंद्रभागेत विसर्जन…

 

 आज सबंध सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर शहर व तालुक्यातील जनतेने कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांचे अस्थिस्वरुपात शेवटचे दर्शन घेतले. यावेळी अवघी पंढरी नगरी गहिवरलेली आढळुन आली. जनसामान्यांच्या सर्वांगीन विकासासाठी आजन्म चंदनाप्रमाणे झिजलेले संतस्वरुप राजकीय जेष्ठ नेते माजी आमदार कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या अस्थिकलशांचे दर्शन आज पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेने व शहरातील नागरिकांनी घेतले. अस्थिकलशाचे घेताना प्रत्येकाचा कंठ दाटुन आलेला होता. 

आाज तालुक्यातील विविध गावात ग्रामस्थांना आपल्या नेत्याचे अस्थिकलश स्वरुपातील शेवटचे दर्शन घेता यावे यासाठी योग्य नियोजन केले होते. यानुसार गावागावातुन जनतेने कर्मयोग्याचे अंतिम दर्शन घेतले. यानंतर हे सर्व अस्थिकलश पंढरीत आणण्यात आले. पंढरीतही परिचारक यांच्या वाड्यासमोर तमाम पंढरपूरकरांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. चंद्रभागेत अस्थिंचे विसर्जन करण्यासाठी अस्थिकलश नेताना पांडुरंगाच्या नामस्मरणात टाळमृदंगाच्या निनादात पांडुरंगाच्या मंदिरास उजवी प्रदक्षिणा घालण्यात आली. आरती नंतर चंद्रभागेच्या पात्रात अस्थिंचे विसर्जन करण्यात आले. पांडुरंगाच्या सेवेधारी, जनसामान्यांचे कैवारी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग स्वरुपात लीन झाले. यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर व कार्यकर्ते आपल्या नेत्यास अंतिम निरोप देण्यासाठी आलेले होते. यावेळी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी आदरांजली अर्पण केली. 


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *