धाराशिव साखर कारखाना युनिट १ लि. चोराखळी, उस्मानाबाद सन२०२०-२१चा “९वा बाॅयलर अग्निप्रदिपन” शुभारंभ झाला. चोराखळीचे मा. सरपंच, कारखान्याचे सभासद श्री.खंडेराव मैदांड यांच्या सुविद्य पत्नी सौ.अरूणाताई मैदांड यांच्या हस्ते होम हवन पुजा संपन्न झाली.
याशुभप्रसंगी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन ब्रिजलाल मोदाणी, व्हाईस चेअरमन विश्वासआप्पा शिंदे, मनसेचे सहकार सेनेचे शाॅडो सहकारमंत्री दिलीपबापू धोत्रे, अनंत आखाडे दाजी, डाॅ. जोगदंड, मनसेचे शशिकांत पाटील, सोमनाथ राऊत, रविराजे देशमुख, अभिजीत हुबे, सरपंच बाबा साठे यावेळी कारखान्याचे संचालक रणजित भोसले, दिपक आदमिले, विकास काळे,रामभाऊ रांखुडे,आदी कर्मचारी उपस्थित होते.
कोरोनाच्या काळात सोशल डिस्टिंगशन ठेवून कारखान्याची कामे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुर्ण केली. कारखान्याची सगळी कामे अंतिम टप्यात असून गाळपासाठी कारखाना सज्ज होऊन चार लाख उच्चांक गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे.
कर्मचाऱ्यांना पगार वाढ देण्यात आली. पुढील काळात ज्युस ते इथेनॉल प्रक्रिया लवकरच चालू करणार असून आसवणी प्रकल्प हा पुढील काही महिन्यात सुरू होत आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव देण्याचे घोषीत केले. कोरोनाच्या काळात शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या अडचणीत आला असून यंदा पावसाने कृपादृष्टी दाखवल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान असून शेतकऱ्याची पिकं, ऊस चांगल्याप्रकारे आली असून त्यामुळे ऊस टनेजमध्ये वाढ आहे. शेतकऱ्यांनी आजपर्यंत कारखानावर ठेवलेल्या विश्वासाला जागत ऊस देऊन सहकार्य करावे. असे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!
पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी


