👁 7 Views

पंढरपूर सिंहगडच्या २६ विद्यार्थ्यांची “फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स” कंपनीत निवड ○ पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज ची प्लेसमेंट मध्ये उत्तुंग झेप


पंढरपूर: प्रतिनीधी

कोर्टी ता. पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील २६ विद्यार्थ्यांची “फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स” या कंपनीत निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

…………….

 

Advet.  


……………

 “फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स” ही कंपनी जगभरातील बर्‍याच ऑटोमोटिव्ह ओईएमसाठी एक पसंतीचा भागीदार आहे. फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्सचे भारत, जर्मनी आणि हंगेरीमध्ये ६ मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत आणि २५०० हून अधिक व्यक्तींच्या मजबूत टीमने हे चालविले आहे. फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने ऑटोमोबाईल उद्योगासाठी बँकेचे भागीदार आणि समाधान प्रदाता म्हणून नावलौकिक मिळविला आहे. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील २६ विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे.
     “फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स” या कंपनीत महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील सुयश महामुनी, निलकंठ्ठ सोनटक्के, विशाल चवरे, सौरभ चव्हाण, कापिनाथ चोपडे, सतीश कचरे, संदेश मुजमुले, विशाल पाटील, राहुल वाघमोडे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील सौरभ कराळे, सचिन कोळेकर, शुभम नवगिरे, शुभम साबळे, आकाश कुलकर्णी, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील ऋषिकेश जगताप, अरविंद अयारे, आकाश बनसोडे, जीवन जाधव, सागर केसकर, अमोल वाघमोडे, विठ्ठल भुईकर, अभिजित चांदणकर, प्रशांत सावंत, अरूण भोसले, रवी गाडवे आदी विद्यार्थ्यांची निवड कॅम्पस मुलाखतीतून नीवड करण्यात आली आहे.
  “फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स” कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. संपत देशमुख, डॉ. श्रीगणेश कदम, प्रा. ऋषिकेश देशपांडे, प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा. सुधा सुरवसे, प्रा.अतुल कुलकर्णी, प्रा. भारत आदमिले आदी

सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *