Suvarnaprashan : हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात मुलांच्या बौद्धिक व शारिरीक विकासासाठी त्यांना द्या आयुर्वेदाचे वरदान ! ते म्हणजे अस्सल ‘सुवर्णप्राशन’, ” पालक मंडळी उद्या आपल्या पंढरपुरात असलेली ही सुवर्णसंधी दवडू नका ! मुलांना द्या आयुर्वेदाचं सुरक्षा कवच ‘सुवर्णप्राशन’,’सुवर्णप्राशन’ आता गर्भिणींसाठी सुध्दा उपलब्ध (Advert.)

Loading

 

Pandharpur : उद्या  रविवार दिनांक 7 जुलै 2024  रोजी   सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर, वरील मजला, सोनवणे हॉस्पिटल, भोसले चौक पंढरपूर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत व  डॉ.सोनवणे क्लिनिक, दावत बिर्याणी हॉटेल समोर, इसबावी-वाखरी , पंढरपूर-पुणे रोड, इसबावी, पंढरपुर येथे सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत सदर  सुवर्णप्राशन  (Suvarnaprashan ) शिबीर संपन्न होणार आहे. अशी माहिती डॉ. सौरभ सोनवणे व डॉ.सौ.श्रुती सोनवणे यांनी दिली आहे.

पंढरपूर येथील कै. आण्णासाहेब सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर यांचे वतीने पंढरपूर व इसबावी येथे नवजात बालकांपासून ते 16 वर्षांपर्यंतच्या मुलां-मुलींसाठी सुवर्णप्राशन संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. सौरभ सोनवणे व डॉ. सौ.श्रुती सोनवणे यांनी दिली आहे.

सुवर्णप्राशन संस्कार म्हणजे काय ?
बालकांची स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, रोगप्रतिकारशक्ती व शारीरिक वाढ योग्य प्रमाणात व्हावी यासाठी आयुर्वेदामध्ये सुवर्णप्राशन संस्कार सांगितले आहे.

नवजात बालकांपासून ते 16 वर्षाची मुल-मुली वारंवार आजारी पडत असतील, मुलांची शारीरिक वाढ योग्य प्रमाणात होत नसेल मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल तर यावर सोनवणे आयुर्वेदिक व पंचकर्म सेंटर पंढरपूर यांनी “दोन थेंब बाळाला द्या सुवर्णप्राशनाचे, वरदान लाभेल आरोग्य व बौद्धिक विकासाचे” या उद्देशाने बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी हे सुवर्णप्राशन तयार करण्यात आले आहे.

* सुवर्णप्राशनचे फायदे *

 * बुद्धीमत्ता, स्मरणशक्ती वाढते.

* रोगप्रतिकारशक्ती वाढते,

* त्यामुळे बालक वारंवार आजारी पडत नाही.
* बुद्धी कुशाग्र, तल्लख होते. एकाग्रता वाढून       अभ्यासात मन स्थिर होते.
* शारीरिक विकास योग्य प्रमाणात होतो.
* मुलांची पचनशक्ती वाढून मुले सुदृढ होतात.

सुवर्णप्राशन वयोगट

नवजात बालकांपासून ते वय वर्षे १६ पर्यंतच्या मुला / मुलींसाठी तसेच शारीरिक – मानसिक वाढीमध्ये न्युनता असणाऱ्या मुलांसाठी व मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विशेष उपयुक्त.

सुवर्णप्राशनाचे घटक
शुद्ध सुवर्ण , पिंपळी , वचा , मंडूकपर्णी , शंखपुष्पी , ब्राम्ही , अमृता इ . दिव्य वनस्पती , शुद्ध मध व आयुर्वेदिक वनस्पतीने सिद्ध केलेले गाईचे तुप ( बुद्धीवर्धक घृत ) यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून तयार होणारा सुवर्णप्राश बालकांना बिंदू स्वरुपात दिला जातो.


सुवर्णप्राशन कधी करावे ?
शास्त्राप्रमाणे सुवर्ण प्राशन हे पुष्य नक्षत्राच्या दिवशी चालू करुन त्यानंतर दररोज सकाळी द्यावे पण जर रोज देणे शक्य नसेल तर हे प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी द्यावे, जो प्रत्येक २७ दिवसांनी येतो. या दिवशी सुवर्णप्राशन देण्याचे विशेष महत्व आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुवर्णप्राशन काही महिने सलग दिल्यास चांगले परिणाम दिसून येतात.
सुवर्णप्राशन  डेली डोस बॉटल
आपल्या लाडक्या मुलांना वातावरणातील विषाणु संक्रमणापासुन दुर ठेवण्यासाठी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे आवश्यक आहे, त्यासाठीच त्यांना द्या… सुवर्णप्राशनचा डेली डोस सुवर्णप्राशन डेली डोस बॉटल (रोजच्या रोज घरी देण्यासाठी अत्यंत उपयोगी)

गर्भिणी सुवर्णप्राशन

गर्भिणी सुवर्णप्राशन म्हणजे काय?
गर्भवती महिला व नुकतीच जन्मलेली लहान मुले यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने कोणत्याही इन्फेक्शनला लवकर बळी पडतात.

आयुर्वेदामध्ये गर्भिणी व गर्भस्य शिशु यांना त्यांची शारिरिक व मानसिक वाढ योग्य पद्धतीने होण्यासाठी तसेच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्यांना सुवर्ण देणे गरजेचे असल्याचे वर्णन केलेले आहे. म्हणूनच गर्भिणी स्त्रियांमध्ये सुवर्णप्राशन देणे हे अत्यंत उपयोगी आहे. हा गर्भसंस्कारचाच एक भाग आहे.

गर्भिणी सुवर्णप्राशन केव्हा चालु करावे ?

गर्भवती स्त्रियांनी गर्भावस्थेच्या तिसऱ्या महिन्यापासून सुवर्णप्राशन घेणे चालु करून संपूर्ण गर्भावस्थेदरम्यान दररोज सुवर्णप्राशन घ्यावे व प्रसुतिनंतर सुवर्णप्राशन हे बाळाला देणे चालु करावे.

गर्भिणी सुवर्णप्राशनाचे फायदे

• बालकांच्या मेंदुच्या एकूण वाढीपैकी ८५% वाढ ही गर्भावस्थेत होत असते. तसेच गर्भातील शिशुच्या मेंदुच्या संपूर्ण विकासासाठी सुवर्ण हे आवश्यक असते. म्हणुनच गर्भावस्थेत सुवर्णप्राशन देणे अत्यंत उपयोगी आहे.

• गर्भातील शिशुच्या शरीराचा सतत विकास होत असतो. पाचव्या, सहाव्या व सातव्या महिन्यांमध्ये तर गर्भाच्या मन, बुद्धी व ओजाचा विकास होतो. अशा वेळी सुवर्णभस्म व मेध्य औषधींनी सिद्ध केलेले गर्भिणी सुवर्णप्राशन विशेष उपयोगी पडते.

• गर्भावस्थेमध्ये प्रत्येक महिन्यात गर्भाच्या विशिष्ट अवयवांची निर्मिती व वाढ होत असते. ही वाढ योग्य प्रमाणात व्हावी यासाठी गर्भिणी सुवर्णप्राशन उपयोगी आहे.

• गर्भावस्थेदरम्यान गर्भपात होऊ नये म्हणून अत्यंत उपयोगी.

• गर्भिणीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अत्यंत उपयोगी.

अधिक माहितीसाठी

डॉ.सौरभ सोनवणे
मो . 9890645855 

सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर, वरील मजला, सोनवणे हॉस्पिटल, भोसले चौक पंढरपूर

(वेळ: सकाळी 10 ते सायंकाळी 8)  
…………………………..

डॉ.श्रुती सोनवणे
मो . 9960776427 

डॉ.सोनवणे क्लिनिक, दावत बिर्याणी हॉटेल समोर, इसबावी-वाखरी , पंढरपूर-पुणे रोड, इसबावी, पंढरपुर 

(वेळ : सायंकाळी 5 ते 8)
 येथे संपर्क साधावा.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *