Pandharpur : दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्यावर प्रतिबंधात्मक आदेशानुसार कारवाई करण्यात येणार; उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांच्याकडून प्रतिबंधात्मक आदेश

Loading


पंढरपूर दि. 12:-  आषाढी शुद्ध एकादशी सोहळा १७ जुलै २०२४ रोजी होणार असून, आषाढी यात्रा सोहळयाचा कालावधी दिनांक ०६ जुलै २०२४ ते २१ जुलै २०२४ आहे. या यात्रा सोहळ्याच्या कालावधीत लाखो भाविक श्री. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. दर्शन रांगेत घुसखोरीमुळे अनुचित प्रकार घडून चेंगराचेंगरी अथवा अन्य कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी दर्शनरांगेत घुसखोरीस प्रतिबंधासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (२) अन्वये उपविभागीय दंडाधिकारी सचिन  इथापे यांनी आदेश पारीत केले आहेत.

   आषाढी यात्रा सोहळा कालावधीत लाखो भाविक श्री. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. यावेळी दर्शनासाठी अनेक तास भाविक दर्शनरांगत उभे असतात, आणि भाविकांना दर्शन सुकररित्या होणेकरीता दर्शनरांगेचे व्यवस्थापन होणे आवश्यक असून, काही इसमामार्फत दर्शनरांगेत घुरखोरी होत असल्याबाबत प्रसारमाध्यमातून व भाविकांच्या तक्रारीतून निदर्शनास येत आहेत. या घुसखोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक आदेश पारीत करण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (२) अन्वये अधिकार प्राप्त आहेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित इसम कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *