👁 9 Views

“बोगस नंबर प्लेट लावलेले वाहन घेतले ताब्यात!” निर्भया पथक अधिकारी PSI सुधीर घुले व टीमची कौतुकास्पद कामगिरी

Pandharpur Live: मोटर वाहन कायदा व वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनांवर पोलीस विभागाकडून ई-चलन कार्यपद्धतीद्वारे चालान कारवाई केली जाते. 

ज्या वाहन चालकांवर ई-चालानद्वारे कारवाई केली आहे त्यामधील काही वाहन चालकांनी वाहतूक नियंत्रण शाखा सोलापूर ग्रामीण येथे संपर्क केला व माझी गाडी हुंदई क्रेटा असून चलनाच्या फोटोमध्ये दिसणारे वाहन टाटा हेक्सा आहे. सदर वाहनास माझ्या वाहनाचा नंबर वापरत आहे, अशा तक्रारी प्राप्त झाल्याने सदर वाहनावर नाकाबंदी, पेट्रोलींग दरम्यान वाहन ताब्यात घेणे बाबत सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये कळविण्यात आले होते. 

    …………………..

    ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

    “पंढरपूर लाईव्ह” चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

    https://youtube.com/c/PandharpurLive

    ”जनसामान्यांच्या मनाचा आरसा” @Pandharpur Live

    संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

    Mail: livepandharpur@gmail.com

         ………………….

त्यानुसार पंढरपूर शहर वाहतुक शाखेचे चाणाक्ष व कर्तव्यदक्ष PSI सुधीर घुले (निर्भया पथक अधिकारी) यांनी पाठलाग करून सदर वाहन शिताफीने पकडुन खात्री केली असता नंबर प्लेट वर खाडाखोड केली असल्याचे निदर्शनास आले.

त्या प्रमाणे MH-13-DB-2500 टाटा हेक्सा हे खाडोखोड करून नंबर प्लेट  लावलेले वाहन आज रोजी पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे लावण्यात आले आहे.

अशा आणखी तक्रारी प्राप्त होत आहेत, या पुढेही अशा प्रकारची मोहीम सुरू राहणार आहे अशी माहिती पीएसआय घुले यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *