👁 9 Views

राज्यातील कोरोनामुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा ‘या’ तारखे पासून सुरू होणार

 Pandharpur Live Online: राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या विभागात पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरु करण्याबाबतचा शासन निर्णय आज शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. शाळेतील नियमित शिक्षणाचा लाभ विद्यार्थांना मिळावा यासाठी कोरोनामुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्याची बाब विचाराधीन होती. राज्यातील कोरोनामुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती/स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ठरावांनी कोरोना निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतील इय्यता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करुण्यास शासन मान्यता शिक्षण विभागाकडून दिली आहे. पालकांशी चर्चा करुन ठराव करावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सल्यानुसार मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

    ………………..

    ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

    “पंढरपूर लाईव्ह” चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

    https://youtube.com/c/PandharpurLive

    ”जनसामान्यांच्या मनाचा आरसा” @Pandharpur Live

    संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

    Mail: livepandharpur@gmail.com

         ………………….

आठवी ते बारावी वर्ग ज्या गावात सुरू करायचे आहेत, त्या गावात किमान महिनाभर आधीपासून एकही कोरोनाबाधित नसावा. शिवाय, ग्रामपंचायत स्तरावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घेण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच, शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन जिल्हाधिकारी यांनी नियोजन करावे, असे सुद्धा शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. पण काही तांत्रिक बाबींमुळे हा शासन निर्णय स्थगित करून आज पुन्हा नव्याने आठवी ते बारावी वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे.


शाळा सुरू करत असताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवण्यात यावे. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आरोग्य सूचनांचे पालन करून वर्ग घेण्यात यावे अशी सूचना दिल्या आहेत . एका बाकावर एकच विद्यार्थी व दोन बाकामध्ये मध्ये सहा फुटाचे अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी असावे. शाळेत विद्यार्थ्यांनी सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर करणे, कोरोना सदृश्य कोणतीही लक्षणे दिसल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे आणि त्याची योग्य ती चाचणी करावी, अस मार्गदर्शन सूचनामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *