👁 9 Views

पंढरपूर तालुका हादरला… ‘या’ गावात खुन! अनेक दिवसांपासुन गायब असलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळला भयंकर अवस्थेत!

मयत- मधुकर सावंत

पंढरपूर Live : पंढरपूर तालुक्यातील एका गावातून 6 दिवसांपासून गायब असलेल्या व्यक्तीचा मृतदेह अतिशय भयंकर अवस्थेत आढळून आला. तालुक्यातील पिराची कुरोली या गावातील एका ५० वर्षीय व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी अंगावरील कपड्यात दगड बांधून विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे आजच नव्याने हजर झालेले तडफदार पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सदर खुनाच्या गुन्ह्याच्या संबंधाने आज तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. माहिती घेतली, घरातील नातेवाईकांना विचारपूस केली. सदर खुनाच्या गुन्ह्यास वाचा फुटेल असा विश्वास व्यक्त केला . 

 पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथील मधुकर सावंत हे ११ ऑगष्ट रोजी कामानिमित्त घरातून बाहेर गेले होते. बाहेर गेल्यानंतर ते आपल्या घरी परतलेच नाहीत. नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला परंतु ते कोठेच आढळले नाहीत. अखेर सहा दिवसानंतर गावातील शांताबाई सावंत यांच्या शेतातील विहिरीत पाण्यावर मधुकर सावंत यांचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती समजली. ही माहिती कळताच नातेवाईकांनी जाऊन विहिरीत पाहिले असता सदर मृतदेह मधुकर सावंत यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. 

…………

……………..

पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि  मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. मयत मधुकर सावंत यांच्या डोक्यावर जखम असल्याचेही आढळून आले आहे. कुणीतरी मधुकर सावंत यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह विहिरीत टाकला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. खुनाच्या या घटनेमुळे पिराची कुरोली पंचक्रोशीत प्रचंड खळबळ उडाली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *