👁 10 Views

बायकोचा माहेरी जाण्याचा हट्ट… वैतागलेल्या नवऱ्यानं घेतली थेट कालव्यात उडी!

 

प्रतीकात्मक छायाचित्र 

Pandharpur Live Online: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी सतत माहेरी नेण्याचा हट्ट करत असल्यानं पतीनं टोकाचं पाऊल उचललं. वैतागलेल्या पतीनं कालव्यात उडी मारली. सुदैवानं त्याचवेळी तिथून एक पोलीस कर्मचारी जात होता. त्यानं स्वत:चा जीव धोक्यात घालून बुडणाऱ्या पतीला वाचवलं.

…………

………………..

………………….

गाझियाबादच्या मसूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. राहत वसाहतीत वास्तव्यास असलेल्या अझहरुद्दीन यांनी कालव्यात उडी मारताच परिसरात खळबळ माजली. उडी मारण्याआधी अझहरुद्दीन कालव्याशेजारी पत्नी रुख्सारसोबत बोलत बसले होते. काही वेळानं त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर रख्सार माहेरी जाण्याची भाषा करू लागली. त्यामुळे नाराज झालेल्या अझहरुद्दीन यांनी कालव्यात उडी घेतली.


अझहरुद्दीन यांनी कालव्यात उडी घेतली, त्याचवेळी स्थानिक पोलीस ठाण्यात तैनात असलेले हवालदार नरेंद्र कुमार तिथून जात होते. त्यांनी स्वत:च्या जीवाची बाजी लावून अझहरुद्दीन यांना वाचवलं. परिसरातील दोन तरुणांनी कुमार यांना सहकार्य केलं. यानंतर रुख्सार यांनी संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *