Pandharpur Live: सालाबादप्रमाणे याही वर्षी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्यालयामध्ये आज सकलांची देवता श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

पंढरपूर लाईव्ह चे मुख्य संपादक भगवान गणपतराव वानखेडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.अंजली भगवान वानखेडे यांचे हस्ते ‘श्री’ ची विधीवत पुजा व आरती करण्यात आली.
लवकरात लवकर संपुर्ण जगाला कोरोनामुक्त कर, सर्वांना सुख, शांती, समाधान व उत्तम आरोग्य लाभु दे! अशी प्रार्थना यावेळी वानखेडे दांपत्यानी विघ्नहर्त्या गणरायाकडे केली. पौरोहित्य विक्रांत विप्र गुरूजी यांनी केले.






