👁 8 Views

गरबा खेळता खेळता घात झाला, हृदयविकराने तरुणाचा दुर्दैवी अंत

 गांधीनगर : सध्या देशभर नवरात्र उत्सवामुळे उत्सवाचं वातावरण आहे. या वातावरणात गरबा, दांडिया खेळण्याचा मोह कुणाला आवरत नाही. देशातील प्रत्येक शहरात गरबा खेळला जातो.


तर गरबा खेळताना एका २५ वर्षाच्या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईतील मुलुंड येथे घडली आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूण गरबा खेळत असताना खाली कोसळताना आपल्याला दिसत आहे. यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर आजकाल तरूणांना हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटना वाढल्या आहेत.


ऋषभ मंगे भानुशाली असं या तरूणाचं नाव असून तो २७ वर्षीय असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्याने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले असून तो बोरिवली येथे एका खासगी कंपनीत कामाला असल्याचं सांगणयात येत आहे. डोंबिवली पश्चिम येथे तो आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. तो घरात एकटाच कमावता मुलगा असून त्यामुळे त्यांच्या घरावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *