👁 5 Views

कर्मयोगीच्या दोन विद्यार्थिनीची टीसीएस मध्ये निवड.

 अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात असतानाच बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड.   

टाटा कन्सलटंसी सर्विसेस या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील आकांक्षा मुढे व ऋतुजा आसबे या दोन विद्यार्थिनीची निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. 


टाटा कन्सलटंसी सर्विसेस या कंपनीने घेतलेल्या अंतिम निवड फेरीतून कम्प्युटर सायन्स अँड इंजीनीरिंग विभागातील तिसर्‍या वर्षात शिकत असणार्‍या आकांक्षा मुढे व ऋतुजा आसबे या विद्यार्थिंनीची निवड करण्यात असून त्यांना वार्षिक 3.5 लाखांचे पॅकेज मिळाले आहे. टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस लिमिटेड ही माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात काम करणारी जगातील प्रख्यात भारतीय कंपनी आहे. 

 विशेष महत्वाची बाब म्हणजे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होण्या आधीच विद्यार्थिंनींची नामवंत कंपनी मध्ये उत्तम पॅकेज मिळाले असल्याने विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आणि महाविद्यालयाच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. कर्मयोगी मध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणा बरोबर च कार्पोरेट क्षेत्रामध्ये आवश्यक असणार्‍या सर्व मूलभूत कौशल्यांचा सखोल अभ्यास करून प्रशिक्षीत केले जाते आणि त्याचाच परिणाम म्हणून आज शिक्षण पूर्ण होण्या आधीच विद्यार्थ्यांची विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड होताना दिसून येत आहे यामुळे विद्यार्थी व पालक वर्गामद्धे आनंदाचे वातावरण आहे.


 श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, प्रा. दीपक भोसले तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख व प्राध्यापक यांनी  निवड झालेल्या विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *