👁 7 Views

दोन्हीं पाय नसलेल्या आशिक ने दोन वर्षाच्या मुलीला पळविले

 मूल चोरीच्या घटना वाढीस लागल्या असून, मुंबईत मूल चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुडघ्याच्या खाली दोन्ही पाय नसलेल्या एका व्यक्तीने 2 वर्षांच्या मुलीचं अपहरण केलं आहे.


वांद्रे परिसरात ही घटना घडली असून हा मूल चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी या सीसीटीव्ही वरून आरोपीचे छायाचित्र मिळवले असून, हा आरोपी दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या आरोपीचे नाव ‘आशिक’ असल्याचे कळाले आहे. आशिक हा दोन्ही पायांनी अपंग असून, त्याला गुडघ्याखाली पाय नाहीयेत. आशिकला पाय नसले तरीही तो गुडघ्यावर व्यवस्थित चालू शकतो. आशिक हा अट्टल गर्दुल्ला असून त्याला अंमली पदार्थांचे व्यसन आहे. आशिक हा भीक मागून आपलं पोट भरतो.


आशिकला वांद्रे परिसरात फिरत असताना दोन वर्षांची मुलगी घराबाहेर खेळताना दिसली होती. आशिकची नजर तिच्यावर पडली आणि त्याने गोड बोलून या मुलीला कडेवर घेऊन तिथून पळ काडला. बराच वेळ झाला तरी मुलगी न दिसल्याने घरच्यांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली.


 मुलगी कुठेच न सापडल्याने तिच्या घरच्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये त्यांना पाय नसलेला एक व्यक्ती तिला उचलून नेताना दिसला. यानंतर कुटुंबियांनी तातडीने वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *