👁 7 Views

ठाण्यात भररस्त्यात महिलेला मारहाण

 राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये, चोरी, मारहाण यांसारख्या घटनांचा समावेश आहे. 


अशाच एका मारहाणीच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये काही महिलांकडून एका महिलेला भररस्त्यात मारहाण  करण्यात आली आहे.


ठाण्यातील टिटवाळा या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका महिलेला लाकडी काठीने काही महिला मारहाण करताना दिसत आहेत. पीडित महिलेला नेमकी कोणत्या कारणामुळे मारहान करण्यात आली हे मात्र अजून समजू शकलेले नाही.


 या मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ही धक्कादायक घटना टिटवाळा येथील गणेश मंदिर परिसरामध्ये घडली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *