👁 10 Views

पत्नीच्या बदनामीचा व्हीडिओ व्हायरल

 पत्नीचा बदनामीकारक व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर पोस्ट केला. तसेच, तीचा शारीरिक व मानसिक छळ केला. हा प्रकार 18 एप्रिल 2018 ते 9 ऑक्टोबर 2022 या कालावधीत म्हापसा, गोवा आणि कासारवाडी, पुणे येथे घडला.


पती मयूर शरद शेटगावकर (34), शरद सदू शेटगावकर (76), दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी घरगुती कारणावरून वेळोवेळी माहेरहून पैसे आणण्यासाठी शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. 


तसेच, विवाहितेची बदनामी करण्यासाठी तिचा बदनामीकारक व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायलर केला. अशा प्रकारे आरोपींनी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *