👁 8 Views

नवरात्री क्वीन स्पर्धेचे शानदार आयोजन

आद्य वीरशैव  मंडळाच्या वतीने नवरात्री निमित्त महिलांसाठी “मिसेस नवरात्री क्वीन” स्पर्धेचे भव्य दिव्य प्रमाणात आयोजन  करण्यात आले होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ.अंजलीताई अवताडे व नगराध्यक्षा साधनाताई भोसले या उपस्थित होत्या.सौ.विनया उत्पात-कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले.


      स्पर्धेत सर्वपरिचय व प्रश्नोत्तरे असे 2 राउंड ठेवण्यात आले होते.लक्ष्मी, गौरी, पार्वती, कालिका, महाकाली व सरस्वती अशा देवींच्या विविध रूपांचे दर्शन हे स्पर्धेचे आकर्षण होते.यात बर्याच महिलांनी सहभाग नोंदविला.एकूण 5 बक्षिसे देण्यात आली.त्यातील 3 बक्षिसे श्री. फुलचंद भट्टड यांनी दिली.कार्यक्रमात आद्य वीरशैव महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी देवीची आराधना, आरती,जोगवा,दांडीया व गरबा सादर केला.कार्यक्रमाची सुरुवात कु.गौरी महाजन हिने गणेश स्तवनाने केली.सौ.पल्लवी पावले यांनी प्रवेशद्वारात तुळजाभवानीची आकर्षक रांगोळी काढली.प्रचंड उत्साहात आणि महिलांच्या गर्दीत कार्यक्रम संपन्न झाला.प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा डॉ.सौ.शोभाताई कराळे यांनी कार्यक्रमाचे आगळेवेगळे आयोजन (हटके)आहे असे सांगितले.


         तसेच स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्रीमती मानसीताई केसकर व श्रीमती अंजली ताई बारसवडे यांनी काम पाहिले.यामध्ये प्रथम क्रमांक सौ.श्रद्धा म्हमाणे, द्वितीय क्रमांक सौ.आश्विनी झाडे, तृतीय क्रमांक सौ.स्नेहल म्हमाणे उत्तेजनार्थ सौ.सुवर्णा राहिरकर व बेस्ट कॉस्च्युम रेणूका म्हमाणे यांना देण्यात आली.ही दोन्ही उत्तेजनार्थ बक्षीसे सानिया शॉपीतर्फे देण्यात आली.


         या कार्यक्रमासाठी मंडळाच्या उपाध्यक्षा सौ.विशालाक्षी पावले व संजीवनी ठिगळे तसेच मंडळाच्या पदाधिकारी सौ.मनिषा वासकर, सौ.दिपाली मुचलंबे, सौ.सुनिता लिगाडे, सौ.कविता पावले,सौ. माधुरी भिंगे, सौ.महानंदा भिंगे, सौ.स्नेहल म्हमाणे, सुनिता राहिरकर,सौ.आरती पावले,शारदा उखळे,सौ. राजश्री कळसे व अनुराधा स्वामी यांनी परिश्रम घेतले.तसेच कार्यक्रमासाठी अर्बन बँकेचा हॉल व नाष्टा श्री.दिपक शेटे यांनी उपलब्ध करून दिला.कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *