👁 6 Views

रागाने केला घात , पती पत्नीचा वाद विकोपाला गेल्याने पतीने उचलले’ हे, पाऊल

 भंडारा  जिल्ह्यात पती- पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एकदा नात्यात संशय निर्माण झाला कि ते नाते जास्त काळ टिकत नाही.


घटनेत देखील असेच काहीसे घडले. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील पिंपळगाव निपाणी  या ठिकाणी आरोपी पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन डोक्यात वरवंटा घालून तिची हत्या  केली. या प्रकरणी पतीला अटक  करण्यात आली आहे.


अर्चना अरविंद रामटेके  असे मृत महिलेचे नाव आहे तर अरविंद माधव रामटेके आरोपी पतीचे नाव आहे. पवनी तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील अरविंद रामटेके यांचा चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील चांदोली या ठिकाणच्या अर्चना यांच्यासोबत 20 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोन वर्षांपासून पती अरविंद हा पत्नी अर्चना हिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात नेहमी वाद होत होते.


घटनेच्या दिवशीदेखील याच कारणामुळे या दोघांमध्ये विकोपाचे भांडण झाले.
यानंतर याच भांडणाच्या रागातून आरोपी अरविंदने रात्री 8 च्या सुमारास घराचा दरवाजा बंद केला आणि पत्नीच्या डोक्यात वरवंटा घातला.
या सगळ्या प्रकाराची माहिती मिळताच गावकऱ्यांनी अर्चनाला उपचारासाठी भंडारा सामान्य रुग्णालयात नेले.
मात्र, त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
मुलगा भाविक रामटेके यांच्या तक्रारीवरून अड्याळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
यानंतर पोलिसांनी पती अरविंद रामटेके याला अटक केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *