👁 5 Views

१९ लोकांची शिकार करणाऱ्या वाघाला जेरबंद

 भंडारा जिल्हासह गडचिरोली, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात 19 लोकांची शिकार करण्याऱ्या नरभक्षी सी टी 1 नरभक्षी वाघाला गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा येथे जेरबंद करण्यात आले आहे.


विशेष म्हणजे गडचिरोलीतील 13, गोंदिया 2, भंडारा जिल्ह्यात 4 लोकांचा या नरभक्षी वाघाने फडशा पाडला होता. एकूण 19 लोकांना या वाघाने ठार केले. मागील महिन्याभरापासून या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या टीम जंगलात ठाण मांडून बसल्या होत्या. मात्र पावसामुळे वाघाला जेरबंद करण्यात कुठेतरी अडथळा निर्माण होत होता. मात्र आज सकाळी वनविभागाच्या सापळ्यात अडकताच शूटरने बेशुद्धीच इंजेक्शन देऊन नरभक्षक वाघाला अखेर जेरबंद करण्यात यश आले. यामुळं नागरिकांनी अखेर सुटकेचा निःश्वास घेतला आहे.


टायगर अभी पिंजरे मे बंद अशी माहिती पडताच गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज शहरात नागरिकांची गर्दी उमटली. या नरभक्षक वाघाने जवळपास 19 नागरिकांचे बळी घेतले आहेत.

देसाईगंज आणि आरमोरी या तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचा बळी या नरभक्षक वाघाने हल्ला करून घेतला. सिटी-१ या नरभक्षक वाघाने गेल्या काही महिन्यात गडचिरोलीसह भंडारा, चंद्रपूर, तीन जिल्ह्यांत धुमाकूळ घातला होता.


काही दिवसापासून वन विभागाचे दोन पथक देसाईगंज आणि आरमोरी भागात वाघाला जेरबंद करण्याचे प्रयत्न करीत होते. आज 13 ऑक्टोबरच्या सकाळी या वाघाला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात आले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *