👁 8 Views

पंढरपूर सिंहगडच्या २६ विद्यार्थ्यांची “क्यु स्पायडर” कंपनीत प्रशिक्षणासाठी निवड

 पंढरपूर:  प्रतिनिधी 

अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळत आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन कॅम्पस प्लेसमेंट मधुन नामांकित कंपनीत नोकरी देण्यासाठी पंढरपूर सिंहगड महाविद्यालय नेहमी प्लेसमेंट पुर्व प्रचंड सराव, मुलाखती, चर्चासत्र आयोजित करून कठोर परिश्रम घेत असते


 यामुळेच महाविद्यालयातील “क्यु स्पायडर” कंपनीत २६ विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.


  चालू शैक्षणिक वर्षांत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील ४३५ हून अधिक विद्यार्थ्यांना वेगवेगळया नामांकित कंपनीत नोकरी मिळाली आहे. 


महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कॅम्पस मुलाखतीतून मधुन आय. टी. क्षेत्रातील कार्यरत असलेल्या पुणे येथील “क्यु स्पायडर” कंपनीत महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील स्नेहल भाकरे, सोमनाथ बगाडे, संदीप चौगुले, दिपाली शिवणकर, काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील असावरी कांबळे, अमृता माळी, शोएब मुलाणी, आकाश शिंदे, शुभम भुसे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील पुजा कापसे, रणजित नलवडे, अऐशा शेख,  इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील रणजित नलावडे, मारीया साळवे, ऋतुजा देशमुख, तेजश्री लोखंडे, साहिल शेख, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील शुभम जोशी, विजय ढोबळे, समाधान माळी, शशिकांत गिरी, सुयश गुजरे, शरद टोणे, अक्षयकुमार माने, मनिषा खिलारे, प्रणित गोडसे, पशुपती बनसोडे आदी विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.

 “क्यु स्पायडर इन्क्यूबेशन” कंपनीत विद्यार्थ्यांना मोफत मॅन्युअल टेस्टिंग, एस. क्यु. एल., जावा आदी मध्ये ३-६ महिन्यांत प्रशिक्षण देण्यात येते.  प्रशिक्षण झाल्यानंतर वेगवेगळ्या आय टी कंपनीत नोकरीची संधी उपलब्ध करू दिली जाते. “क्यु स्पायडर इन्क्यूबेशन” कंपनीत प्रशिक्षण घेणेसाठी विद्यार्थ्यांना ३० ते ३५ हजार रूपये मोजावे लागतात माञ पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील विद्यार्थ्यांना ते मोफत दिले जाते. 


  प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *