👁 9 Views

मुलगी बाबांसह कारमध्ये , कार पुराच्या पाण्यात बघता बघता पाणी कारमध्ये शिरलं आणि

 सातारा जिल्ह्यामध्ये काळीज हेलावून टाकणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुलीसह वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

कारमधून जात असताना वडील आणि मुलीनं केलेलं प्रवास त्यांच्या आयुष्यातील अखेरचा प्रवास  ठरला. पुराच्या पाण्यात एक अर्टिगा कार बुडाली. या कारमध्ये वडील आणि मुलगी जे अडकले, ते जिवंत बाहेर येऊ शकले नाही. या थरारक घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. या घटनेनं एकच हळहळ व्यक्त केली जाते आहे.


साताऱ्यात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे नद्या आणि ओढे दुथडी भरुन वाहून लागले होते. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणी रस्त्यावरुन पुराच्या पाण्याचा प्रवाह सुरु झाला होता. अशात एका मार्गावरुन जात असताना मुलगी आणि वडिलांवर काळानं घाला घातला.


साताऱ्यातील सोमंथळी-सस्तेवाडी दरम्यान ही दुर्घटना घडली. एक मारुती अर्टिगा कारमधून लेकीसह वडील निघाले होते. छगन मदने आणि प्रांजल मदने अशी कारमधील दोघांची नावं होती. सोमंथळीजवळ मात्र एक विचित्र घडना घडली.


मदने यांची अर्टिगा कार पुराच्या पाण्यात अडकली. पुराच्या पाण्यातील बाहेर पडण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. पण तो अपयशी ठरला. 


बघता बघता संपूर्ण कारमध्ये पाणी शिरलं. पुराच्या पाण्याने अर्टिका कारला गिळंकृत केलं. यामुळे कारच्या आतमध्ये असलेल्यांना बाहेर पडण्याची संधीसुद्धा मिळू शकली नाही. कारच्या आतमध्येच वडील आणि मुलगी अडकले गेले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *