👁 7 Views

आधी मैत्री करुन महिलेचा विश्वास जिंकला पण तो तर हैवान निघाला

 

कधी-कधी कोणावर विश्वास ठेवणं भारी पडू शकतं. मध्य प्रदेशातील टिकमगढ जिल्ह्यातून अशीच एक सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. एका महिलेवर सहा जणांनी नैसर्गिक पद्धतीने बलात्कार केला.


प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सहाही आरोपींना अटक केली.

२६ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला महिनाभरापूर्वी छतरपूर येथून टिकमगड येथे राहायला आली होती. 


जिथे ती आपल्या 3 वर्षाच्या मुलासोबत टिकमगड शहरातील नवीन बस स्टँड येथे भाड्याच्या घरात राहत होती. काही दिवसांपूर्वी तिची आरोपी अरविंद साहू याच्याशी ओळख झाली आणि त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली.


26 ऑक्टोबर 2022 च्या रात्री आरोपी अरविंद साहू याने तिला त्याच्या साइटवर बोलावले होते. जिथे त्याच्या इतर 5 साथीदारांनी महिलेवर बलात्कार केला. घटनेच्या माहितीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून सर्व 6 आरोपींना अटक केली.

या घटनेबाबत टिकमगडचे एसपी प्रशांत खरे यांनी सांगितले की, ‘ही घटना टिकमगडमधील कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील आहे. बुधवारी रात्री आठच्या सुमारास अरविंद साहू यांच्या सांगण्यावरून राहुल यादव दुचाकीवरून या महिलेला घेण्यासाठी आला. 


राहुल यादव, अरविंद साहू यांच्याशिवाय इतर चार जणांनी महिलेचा छळ केला. मारहाण, विनयभंग, अनैसर्गिक बलात्कार केला. सकाळी त्यानंतर महिलेला सोडून देण्यात आलं. महिलेच्या तक्रारीनंतर त्वरित कारवाई करत सहाही आरोपींना अटक केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *