👁 4 Views

पेट्रोल टँकरचा अपघात झाला , लोकांनी गर्दी केली स्फोटात 4 जनाचा मृत्यु 18 जखमी

 

आयझोलमध्ये शनिवारी भीषण अपघात घडला आहे. पेट्रोल टँकरला आग लागून त्याचा स्फोट झाला.


यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले आहेत.

 पोलिसांनुसार ही घटना राजधानीपासून जवळपास १८ किमीवरील तुइरियाल गावात झाली आहे.


हा टँकर सायंकाळी चंफाईला इंधन घेऊन जात होता. टँकरला अपघात झाल्यावर लोकांनी त्यातून बाहेर पडणारे पेट्रोल गोळा करण्यासाठी गर्दी केली. 


यावेळी टँकरला आग लागली आणि स्फोट झाल्याचे आयझोलचे एसपी सी लालरुआ यांनी सांगितले.

स्फोटानंतर चार जणांचा जळून मृत्यू झाला तर १८ जण भाजले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल आहे. यापैकी ५ जणांची प्रकृती गंभीर आहे.


 या स्फोटामुळे एक कार आणि दोन दुचाकींचेही नुकसान झाले आहे. टँकरमध्ये जवळपास 22000 लीटर पेट्रोल होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *