👁 5 Views

पत्नीच्या उपचारासाठी मोठा खर्च , शेळयाही गेल्या चोरीला , कर्जाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

 

वशी (ता. वाळवा) येथील संजय जयवंत चौगुले (वय ३६) यांनी कर्जाला कंटाळून शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. 


सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडीस आली. कुरळप पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.


काही दिवसांपूर्वी संजय चौगुले यांच्या शेळ्या चोरीला गेल्या होत्या. त्या शेळ्या कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आणल्याचे त्यांना समजले.


 यामुळे संजय व त्यांची पत्नी हे दोघे वडगाव येथील बाजारात शेळ्या शोधण्यासाठी गेले होते. मात्र, बाजारात शेळ्या सापडल्या नसल्याने दोघेही परत घरी येत होते. 


वाटेतच त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यात त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या होत्या. पत्नीच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च होऊनही त्या अद्याप बऱ्या झाल्या नाहीत. पत्नीच्या उपचारासाठी चौगुले यांनी कर्जही काढले होते. यामुळे ते निराश होते.

सोमवारी सकाळी ते शेतात गेले होते. बराच वेळ ते घरी न आल्याने दहाच्या सुमारास घरच्यांनी शेतात जाऊन पाहिले असता, 


चौगुले यांनी गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले. यानंतर कुरळप पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली.

 पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पोलीस उपनिरीक्षक घस्ते, अनिल पाटील पुढील तपास करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *