👁 8 Views

मंगळवेढा: बालविवाह रोखला , आई वडिलांचे व मुलीचे केले समुपदेशन

 

मंगळवेढा तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह मंगळवेढा पोलिसांनी रोखून सदर मुलीच्या आई वडिलांचे व मुलीचे समुपदेशन करून,


अल्पवयीन मुलीला सोलापूर येथील बालसुधारगृहात दाखल करण्यात आल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोलापूर ग्रामीणच्या नियंत्रण कक्षाकडून काल दि.७ नोव्हेंबर रोजी सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा पोलिसांना फोन आला,


मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असून तो तात्काळ रोखून कारवाईचे आदेश दिले होते,


उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी तात्काळ पोलिस हवालदार महेश कोळी पो.ह. योगेश नवले, पो.कॉ सोमनाथ माने यांना तात्काळ घटनास्थळी पाठवले असता


पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील एका सज्ञान मुलाशी भाळवणी येथील शेतातील वस्तीवर बालविवाह करण्याची तयारी सुरू होती,

पोलीस हजर झाल्याचे लक्षात आल्याने , नवरदेवाकडचे नातेवाईक बालविवाहाच्या ठिकाणी न येता परस्पर निघून गेले,

पोलिसांनी मुलीस मुलीच्या आईवडील यांना मंगळवेढा पोलिस बालविवाह ठाण्यात हजर केले, तसेच मुलीच्या वयाबाबत खात्री करून पोलिस निरिक्षक माने यांनी मुलीच्या आई वडीलांना कायदयाबाबत जनजागृती करून


त्यांचे मन परिवर्तन केले व १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही असा लेखी जबाब मुलीचे आई वडील व स्वतः मुलीचा देखील लिहून घेतला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *