👁 5 Views

कोरोना झाल्यामुळे लाथा – बुक्क्यांनी मारहाण करुन काढले घराबाहेर

 

तू कोरोना घेऊन घरात आला. तू येथे रहायचे नाही’, असे म्हणून मुलगा व सुनेने सलीम इनामदार यांना लाथा- बुक्क्यांनी मारहाण करून घरातून बाहेर हाकलून दिल्याची घटना राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे (दि.


23 मार्च 2020) रोजी घडली होती. तेव्हापासून सलीम इनामदार बाहेर फिरत आहेत. दरम्यान, याबाबत काल त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.


सलीम शहाबुद्दीन इनामदार (वय 66, रा. राहुरी बुद्रुक ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, (दि. 23 मार्च 2020) रोजी सलीम इनामदार हे कपडे इस्त्री करण्यासाठी घराबाहेर गेले होते. 


ते परत घरी आले असता त्यांचा मुलगा आसिफ सलीम इनामदार व सून शाहीस्ता आसिफ इनामदार (सध्या रा. कोल्हार, ता. राहुरी) हे म्हणाले की, ‘तू येथे रहायचे नाही. कोरोना घेवून घरी आला आहे,’ असे म्हणत सलीम इनामदार यांना लाथा- बुक्कांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली.


तसेच ‘तू परत येथे रहायचे नाही, घरी आला तर तुला जिवे मारून टाकीन,’ असे धमकावत सलीम इनामदार यांना राहते घरातून बाहेर काढून दिले आहे. 

सलीम इनामदार यांच्या फिर्यादीवरून असिफ सलीम इनामदार व शाहिस्ता आसिफ इनामदार (सध्या रा. कोल्हार ता. राहुरी) या दोघां विरोधात ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे


 पालन पोषण आणि कल्याण अधिनियम कलम 24 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरू आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *