👁 6 Views

मित्राच्या प्रेयसीला धमकी देऊन मागितली एक लाख खंडणी

 

एका व्यक्तीने मित्राला प्रेयसीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासह काही गुप्त गोष्टी सांगितल्या. त्या मित्राने मोबाईलमध्ये आवाज रेकॉर्ड केला. ती रेकॉर्डिंग समाज माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन मित्राच्या प्रेयसीला १ लाखाची खंडणी मागितली 


याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. इंद्रदेव घनश्यामी (जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला जरीपटक्यात राहते. तिचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध आहेत. तिच्या प्रियकराची आरोपी इंद्रदेव घनश्यामी याच्यासोबत मैत्री आहे. 


दोघेही सोबतच दारू पितात आणि एकमेकांसोबत राहतात. गेल्या काही दिवसांपूर्वी सदरमधील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटमध्ये सापडलेल्या दोन रशियन युवतीला नागपुरात आणणाऱ्या दलालाशी घनश्याम याचे संबंध आहेत.


गेल्या काही दिवसांपूर्वी महिलेचा प्रियकर आणि इंद्रदेव हा सोबत दारू पित होते. यादरम्यान, मित्राने इंद्रदेवला प्रेयसीबाबत नेहमी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत असल्याचे सांगितले. तसेच तिच्याकडे काही तरुणी असून त्यासुद्धा माझ्या मैत्रिणी असल्याचे सांगितले. 


यासह काही गुप्त बाबीसुद्धा इंद्रदेवला सांगितले. त्याने या सर्व गोष्टी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्या. ती रेकॉर्डिंग घेऊन तो मित्राच्या प्रेयसीच्या घरी गेला. तिला रेकॉर्डिंग समाजमाध्यमांवर प्रसारित करून पोलिसांचे छापे घालण्याची धमकी देऊ लागला.

 कारवाई टाळण्यासाठी तो महिलेला एक लाखाची खंडणी मागत होता. तसेच तो शारीरिक संबंधासाठी तिच्यावर दबाव टाकत होता. त्यामुळे महिलेने जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *