👁 5 Views

प्रेयसीचा गळा कापला अन्, प्रियकराने केली FB पोस्ट… अखेर

 

दिल्लीत प्रियसीचे हत्या करत 35 तुकडे करून फेकल्याची घडली. दरम्यान ही घटना ताजी असताना दुसरी घटना घडली आहे. 


मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका रिसॉर्टमध्ये 25 वर्षीय तरुणीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.


तरूणीची हत्या करून आरोपी तब्बल 5 दिवस पोलिसांच्या हाती लागला नाही. दरम्यान तो पोलिसांना थेट आव्हान देत आहे. 

रोज एक नवा व्हिडिओ बनवून पोलिसांसमोर नवं आव्हान उभं केलं आहे. त्या आरोपीस पडकणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीसही पोलिसांनी जाहीर केले आहे. तरीही तो पोलिसांच्या हाती लागला नाही.


जबलपूरमध्ये मागच्या 5 दिवसांपूर्वी एका तरूणीची हत्या करण्यात आली होती.


 ही हत्या जबलपूरच्या मेखला रिसॉर्टमध्ये आरोपी अभिजीत पाटीदार या तरूणाने केली होती. या हत्येला 5 दिवस उलटूनही मारेकरी पोलिसांच्या हाती लागला नाही. 

उलट तो मारेकरी त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवरून पोलिसांना सतत आव्हान देत आहे. त्याने 5 व्हिडिओ पोस्ट केल्या आहेत.


 हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहत म्हणाला होता. “माझं तुझ्यावर प्रेम आहे बाबू, तुला स्वर्गात भेटू… सॉरी बाबू.” अशा आशयाची पोस्ट लिहली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *