पैशाच्या कारणावरून रांजणगावच्या जीपचालक सुधाकर पुंडलिक ससाणे (वय 35 रा वाघोडा ता मंठा जि जालना, ह मु मंगलमूर्ती कॉलनी, रांजणगाव ) यांचा खून करणाऱ्या आरोपीचा अवघ्या 8 तासात छडा लावण्यात गुन्हे शाखा व वाळूज पोलिसांना यश आले आहे.आरोपी तौफिक रफिक शेख (२४, रा.
कॉलनी, वाळूज) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रांजणगाव येथील सुधाकर पुंडलिक ससाणे यांच्याकडे क्रुझर जीप क्रमांक एम एच 29, इ वाय 5827) असून ते किरायेने जीप चालवितात.
रविवारी सकाळी 8 वाजता मी भाडे घेऊन जात आहे, असे घरी सांगून सुधाकर ससाणे हे घराबाहेर पडले होते. मात्र चार दिवसांपासून ते घरी न परतल्याने तसेच ते मोबाईल फोन उचलत नसल्याने कुटुंबीय काळजीत पडले होते.
सर्वत्र शोध घेऊन ही सुधाकर ससाणे यांचा शोध लागत नसल्याने त्यांचे लहान भाऊ सुभाष ससाणे यांनी मंगळवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पोहेका राम तांदळे व सुधाकर यांचा लहान भाऊ सुभाष हे दोघे वाळूज परिसरात शोध घेत होते.
बेपत्ता सुधाकर यांचे मोबाईल लोकेशन वाळूजच्या गरवारे कंपनीजवळ येत असल्याने पोहेका राम तांदळे व सुभाष ससाणे यांनी गरवारे कम्पनी समोर शोध मोहीम सुरू केली.
यावेळी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास गरवारे कंपनी समोरील सर्व्हिस रोडवर सुधाकर यांची जीप दिसून आली.
यानंतर जीपची पाहणी केली असता प्रचंड दुर्गंधी येत असल्याने पोहेका तांदळे यांनी या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांना दिली.
ही माहिती मिळताच पोलीस उपायुक्त उज्जवला वनकर, सहाय्यक आयुक्त अशोक थोरात, वाळूजचे निरीक्षक सचिन इंगोले, सहायक निरीक्षक विनायक शेळके, उपनिरीक्षक लक्षमन उंबरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन जीप मधील मधल्या सीटवर पोत्यांत ठेवलेला अर्धनग्न अवस्थेत सुधाकर ससाणे यांचा मृतदेह बाहेर काढत शव विच्छेदन साठी शासकीय रुग्णालयात पाठविला.





