👁 6 Views

बसचा भरधाव वेग उठला तरुणाच्या जीवावर

 

नांदोशी येथे पीएमपीच्या भरधाव बसने समोरून येणार्‍या दोन दुचाकींना धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालक स्वराज दत्ता हगवणे ( वय 17, रा.


किरकटवाडी) याचा आज पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दुसर्‍या दुचाकीवरील स्वार ऋषीकेश भोसले हा गंभीर जखमी झाला. 


स्वराज याच्या दुर्दैवी मृत्यूने किरकटवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. हवेली पोलिसांनी बसचालक अरुण भगवान राठोड (वय 23, रा. बालाजीनगर, कात्रज) याच्या विरोधात 304 कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी हवालदार विलास प्रधान तपास करीत आहेत.


स्वराज इयत्ता अकरावीत शिकत होता. मंगळवारी सकाळी तो कॉलेजला जातो म्हणून घरातून गेला होता. कॉलेजमधील मित्रांसोबत तो किरकटवाडीजवळील नांदोशी सणसनगर येथे फिरण्यासाठी गेला होता.


 दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सर्व जण परत येत होते. नांदोशी व सणसनगर या गावांच्या हद्दीत ओढ्याजवळील वळणावर पुण्यातून सणसनगरकडे येणार्‍या भरधाव बसची प्रथम ऋषीकेश भोसले याच्या दुचाकीला ठोकर बसली.

त्याने प्रसंगावधानाने दुचाकी बाजूला घेतली. मात्र, तोंडाला जबर मार लागून त्याचे दात पडले. त्याच्या पाठीमागून दुचाकीवरून येणार्‍या स्वराज याच्या गाडीला बसने जोरदार धडक दिली.


 समोरासमोर धडक झाल्याने स्वराजच्या तोंडाला आणि डोक्याला गंभीर जखमा होऊन रक्तस्राव सुरू झाला. मित्रांनी दुसर्‍या दुचाकीवरून स्वराज याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे मध्यरात्री उपचारादरम्यान स्वराज याचा मृत्यू झाला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *