👁 6 Views

चिमुकलीच्या अंगावर गरम पाणी पडून 10 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यु

 

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 


बाथरूममध्ये अंघोळीसाठी काढून ठेवलेले गरम पाणी अंगावर सांडल्याने अवघ्या दहा महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय.


नाशिकच्या गंगापूर नाका भागात घटना घडली असून या दुर्दैवी घटनेत चिमुकलीचा मृत्यू 


झाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आवेरा शुभम इंगळे असे मृत बलिकेचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार आंघोळीसाठी तापवलेले पाणी अंगावर पडल्याने 10 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना जुना गंगापूर नाका येथील राठी आमराई परिसरात घडली. 


आवेरा शुभम इंगळे असे या चिमुकलीचे नाव आहे. आवेराच्या अंगावर पाणी सांडल्यानंतर ती गंभीर रित्या भाजली होती तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 तीन दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *