👁 6 Views

मेकॅनिकने 2 हजारांसाठी चालकाला संपवले

 

अवघ्या २ हजार रुपयांसाठी रांजणगावच्या जीपचालकाचा खून करणारा आरोपी मेकॅनिक तौफिक शेख (रा.


वाळूज) यास गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यास ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड जप्त केला.


रांजणगाव शेणपुंजी येथील सुधाकर पुंडलिक ससाणे (३५, रा. वाघोडा, ता. मंठा, जि. जालना) याचा त्याच्या ओळखीचा असलेला मेकॅनिक तौफिक शेख (२२, रा. वाळूज) याने २ हजार रुपयांवरून


 झालेल्या वादानंतर रविवारी (दि. १३) पंढरपुरात खून केला होता. खून केल्यानंतर तौफिकने पंढरपुरात तो काम करीत असलेल्या

 दुचाकी शोरूमच्या एका खोलीत मृतदेह लपविला व तो जीप घेऊन नातेवाइकांसोबत पयर्टनासाठी गेला होता.

 रविवारी रात्री परतल्यानंतर मृतदेह जीपमध्ये टाकून ती गरवारे कंपनीसमोरील निर्जनस्थळी उभी केली व तो पसार झाला होता. पोलीस तपासात मंगळवारी रात्री जीपमध्ये ससाणे याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. 


या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या ८ तासांत आरोपी मेकॅनिक तौफिक शेख याला त्याच्या वाळूजमधील घरी छापा मारून जेरबंद केले होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *