👁 5 Views

50 हजार व्याजाने घेतले अन् लाखमोलाचा जीव गमावला

 

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 



रायगड जिल्ह्यात अद्यापही सावकारीचे प्रकार सुरू आहेत या प्रकारातून एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे.


पेण तालुक्यातील दिव येथे राहणाऱ्या तरुणाला मारहाण करून पैशाची वसुली करण्यात येत होती.


 याचकारणावरून त्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. यामुळे पेण तालुक्यात या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.


 दरम्यान याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पेण तालुक्यातील दिव येथे राहणाऱ्या एका तरुणाने घेतलेले व्याजी पैसे वेळेत परत न दिल्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. 


दरम्यान त्या तरुणाला तिघांनी घरासमोर मारहाण केल्याने झालेल्या त्रासाला कंटाळून तरुणाने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली.

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *