मंगळवेढा येथून एका चार वर्षीय अल्पवयीन मुलाला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
याची फिर्याद मनोजकुमार अमरसिंह साहू (वय ३१ वर्षे, व्यवसाय मजुरी रा.
दरम्यान, त्यानंतर २४ तास उलटूनही तपास लागला नाही. पोलिसांनी शुक्रवारी रात्री व शनिवारी दिवसभरात श्वान पथकाने सर्वत्र शोध घेतला आहे.
मात्र श्वान घटनास्थळापासून नऊ किलोमीटरवर दामाजी कारखाना चौकापर्यंतच गेले.
याबाबत माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता सुमारास शिवाजी पार्क मंगळवेढा येथील बांधकामावर काम करणाऱ्या छत्तीसगड येथील मजुराच्या मुलास अज्ञात व्यक्तीने अपहरण केले.
पोलिसांनी फिर्यादी मनोजकुमार अमरसिंह साहू व इतर साथीदारांच्या मदतीने सर्वत्र शोध सुरू केला. मात्र २४ तास उलटूनही रणवीरकुमार सापडला नाही.
शिवाजी पार्कपासून ते संत दामाजी कारखान्याच्या जवळपास असणाऱ्या म्हसोबा देवस्थानच्या पुढे कारखाना चौकाच्या आसपास श्वानाने मार्ग दाखवला. पोलिस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.





