👁 9 Views

बनावट ग्राहक होऊन रचला सापळा , वाघाचे अवयव विकणाऱ्या 2 शिकाऱ्याना अटक

 

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील नाकडोंगरी वनविभागात वाघाची शिकार करून त्याचे अवयव विकणाऱ्या 2 शिकऱ्याना वनविभागाच्या संयुक्त टीमने अटक केली आहे.


 गोबरवाही येथे दुचाकीवरून वाघाचे अवयव विक्रीसाठी नेणाऱ्या 2 शिकाऱ्यांना वनाधिकाऱ्यांच्या टीमने शनिवारी 19 नोव्हेंबर रोजी पकडले. 


संजय श्रीराम पुषप्तोडे (44), रा. पवणारखारी, रामू जयदेव ऊईके (33) रा. चिखला अशी या 2 अटक केलेल्या शिकाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून वाघनखे, सुळेदात आणि हाडे जप्त करण्यात आली आहेत.


तुमसर तालुक्यात वाघाच्या अवयवाची तस्करी होत असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली होती. 


वाघाच्या अवयवांची विक्री करण्यासाठी वनाधिकारीच बनावट ग्राहक बनून शिकाऱ्यांशी संपर्क केले. दोन दिवस शिकाऱ्यांसोबत बनावट ग्राहक बनून वनाधिकाऱ्यांची चर्चा सुरु होती. 

अखेर शनिवारी व्यवहाराचा निश्चित झाला. गोबरवाही येथे हे दोन्ही आरोपी दुचाकीवरून पोहचले. शिकाऱ्यानी त्यांच्या कडील पिशवीमधील वाघाचे अवयव दाखवताच वनाधिकाऱ्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले. 


त्यांच्याकडून 15 वाघ नखे, 3 सुळे दात, 10 दातांच्या जोडी, हाडे आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *