पंढरपूर, दि.20, (उ. मा. का.) :- राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी
आज श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे सपत्नीक दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांच्याहस्ते शाल
व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह
मान्यवर पदाधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.





